मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हिमालय पुत्र सुंदरानंद यांचे देहावसान, ‘फोटोग्राफर बाबा’ म्हणून ओळखले जाणारे संन्यासी

by Gautam Sancheti
डिसेंबर 24, 2020 | 5:28 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20201224 WA0003 e1608787847498

डेहराडून –  हिमालयातील क्षेत्रात ‘फोटोग्राफर बाबा’ म्हणून ओळखले जाणारे संन्यासी स्वामी सुंदरानंद यांचे  बुधवारी रात्री देहावसान झाले. ते ९७ वर्षांचे होते. आपल्या कॅमेराने टिपलेल्या लक्षावधी छायाचित्रांच्या माध्यमातून सुमारे ७० वर्षातील हिमालयाच्या स्थित्यंतराचा आलेख जगभर पोहोचविणारे स्वामीजी हे हिमालयाचा संदर्भ कोश म्हणून ओळखले जात.

मूळचे आंध्रप्रदेशातील अनंतपूर चे  रहिवासी असलेले स्वामीजी वयाच्या १३ व्या वर्षी हिमालयात आले. त्यांनी वेदान्ताचे महान भाष्यकार स्वामी तपोवन महाराज यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि आजीवन त्यांची सेवा केली. गुरुंच्याच प्रेरणेने  गंगोत्रीत राहून १९४७ पासून  साधना, हिमालय भ्रमण आणि हिमालयाच्या पर्यावरण रक्षण अभियानाला प्रारंभ केला. गिर्यारोहणाचे अनेक विक्रम प्रस्थापित करीत असताना सत्तर वर्षात सुमारे दोन लाखांवर छायाचित्र टिपली. त्यावर आधारित “हिमालय : थ्रू द लेन्स ऑफ अ साधू” या ग्रंथाचे प्रकाशन दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी केले होते.देश विदेशात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

उत्तर काशीतील प्रसिद्ध “नेहरू पर्वतारोहण संस्थेचे” ते अनेक वर्षे मानद संचालक होते. एव्हरेस्ट वीर तेनसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. एव्हरेस्ट कन्या  बचिंद्री पाल, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी पर्वतारोहणाचे आणि योगासनांचे धडे  स्वामीजींकडून घेतले. १९६२ च्या  भारत – चीन युध्दात  त्यांनी लष्कराला  हिमालयाल अज्ञात रस्ते दाखवून  मार्गदर्शन केले होते. त्यांच्या या कार्याचा बहुमान म्हणून हिमालयातीय एका मार्गाला त्यांचे नाव देण्याला आले. शिवाय गंगोत्रीच्यावर असलेल्या एका ग्लेशियरला  “सुंदर ग्लेशियर” आणि एका शिखराला “सुंदर शिखर” म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपती भवन, संसद भवन, विविध विधान भवने यापासून देशातील प्रमुख शहरात त्यांनी  स्लाईड शो चे शेकडो   कार्यक्रम केले आणि जनसामान्यांना हिमालयाचा परिचय करून दिला. देशातील प्रमुख मासिकात आणि वर्तमानपत्रातून त्यांनी विपूल लेखन केले. डिस्कवरी चैनल, जपान ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनने त्यांच्यावर माहितीपट तयार केले आहेत़.

त्यांचे वास्तव्य १९४७ पासून  गंगोत्रीतील तपोवन कुटीत होते. तेथेच “तपोवनम् हिरण्यगर्भ” नावाची पाच मजली आर्ट गॅलरी उभारण्यात आली आहे. याच ठिकाणी उद्या (२५ डिसेंबर  ) त्यांना भूसमाधी दिली जाईल, असे त्यांचे  निकटवर्ती डॉ. अशोक लुथरा यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदवड – नवीन पोलिस निरीक्षक बारवकर यांचे रक्षिता नारी संस्थेतर्फे स्वागत

Next Post

खळबळजनक: ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी एक नवा विषाणू; दक्षिण अफ्रिकेतून आल्याचा संशय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधीक फोटो

खळबळजनक: ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी एक नवा विषाणू; दक्षिण अफ्रिकेतून आल्याचा संशय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात लाखों रूपयांना गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 19, 2025
solar e1703396140989

सौरऊर्जा प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही आहे नवीन योजना….

ऑगस्ट 19, 2025
fir111

माझ्या अंगात अघोरी शक्ती माझ्याशी लग्न कर असं अल्पवयीन मुलीला म्हणणा-या भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल….

ऑगस्ट 19, 2025
GytIpIwa8AACFYK

आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या १५ खेळाडूची घोषणा…यांना मिळाली संधी

ऑगस्ट 19, 2025
crime11

नाशिक शहरातील तिघांना महिलेने घातला तब्बल ४१ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

ऑगस्ट 19, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण चार निर्णय….

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011