मुंबई – भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा अखेर ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या कसोटी सामन्यांसाठी तो सज्ज झाला आहे. मात्र, तो तिन्ही कसोटी खेळू शकणार नाही. दुखापत झाल्यामुळे रोहित शर्मा वनडे आणि टी २० या मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता. रोहित शर्मा याला आता ऑस्ट्रेलियात १४ दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. त्यामुळे तो आता केवळ तिसऱ्या कसोटी सामन्यातच खेळू शकणार आहे. रोहितच्या समावेशामुळे भारतीय संघाचे पारडे तिसऱ्या सामन्यात जड राहिल, असा सर्वांना विश्वास आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यांची मालिका १७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. वन डे मालिका ऑस्ट्रेलियाने तर टी २० मालिका भारताने जिंकली आहे. त्यामुळे कसोटी मालिका कोण जिंकणार याकडे क्रिकेटरसिकांचे लक्ष लागून आहे.