नवी दिल्ली – केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात असलेल्या आंदोलना अंतर्गतच प्रजासत्ताक दिनी ऐतिहासिक ट्रॅक्टर रॅली शेतकऱ्यांनी काढली. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण वळण झाले. त्यात सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले. तसेच, अनेक पोलिस व नागरिकही जखमी झाले. या प्रकारामुळे गेल्या ६१ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सर्व शेतकरी नेते सिंधू बॉर्डरवर एकत्र जमले. यावेळी त्यांनी हिंसाचारासह इतर अन्य बाबींवर चर्चा केली. तसेच, आंदोलनाबाबत ठोस निर्णय घेतला आहे. सरकार जोवर तिन्ही कायदे मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा एकमुखी ठराव यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.