नाशिक – गेल्या काही दिवसापासून सामाजिक विषयावर आधारीत `गुठली` या चित्रपटाचे चित्रीकरण त्र्यंबकेश्वर परिसरात सुरु आहे. या चित्रपटात नाशिककरांना संधी मिळणार आहे. त्यासाठी १९ व २० डिसेंबर सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत त्र्यंबकेश्वर येथे मात्र जावे लागणार आहे. या चित्रपटासाठी एका दृष्यासाठी १५० लहान मुले व मुली ( वय ६ ते १० वर्षे) व ५० विवाहीत जोडप्यांना संधी मिळणार आहे. त्यांच्यावर हे दृष्य चित्रीत केले जाणार आहे. ज्यांना या चित्रपटाच्या शुटींगमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांना त्र्यंबकेश्वरच्या नवीन बस स्टॅण्ड शेजारी असलेल्या वेदांत हॅाटेल समोर असलेल्या मैदानावर हजर रहावे लागणार आहे. जव्हार रोडवर हे ग्राऊंड आहे.
युवी फिल्मची निर्मित असलेल्या या चित्रपटाचे प्रदीप आणि सम्राट हे निर्माते आहे. इशरत खान दिग्दर्शक असून चित्रपटाचे लेखन गणेश पंडित यांनी केले आहे. या चित्रपटात संजय मिश्रा, कल्याणी मुळे, सुब्रत दत्त, कांचन पगारे, अर्चना पाटील, किरण भालेराव, यांच्या भूमिका आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभाग घेण्याचे आवाहन रॅाकअवे संस्थापक रमाकांत महाजन यांनी केले आहे. या चित्रीकरण दरम्यान कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळण्यात येणार आहे.
ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी रमाकांत महाजन यांच्या व्हॅाटसअप नंबरवर फोटोसह मेसेज करावे – नंबर 9867104000