नवी दिल्ली – सॅमसंग या प्रसिद्ध कोरियन कंपनीने सर्वात अनोखा स्मार्टफोन गॅलेक्सी एक्सकोव्हर 5 बाजारात आणला आहे. या कंपनीच्या दाव्यानुसार हा स्मार्टफोन सुमारे 1.5 मीटर उंचीवरून खाली पडल्यानंतरही त्याचे अजिबात नुकसान होणार नाही, कारण हा फोन विशेष धक्का शोषूण घेतो.
सॅमसंग गॅलेक्सी एक्सकोव्हर 5 मध्ये या स्मार्टफोनचे आयपी 68 रेटिंग असून वॉटर आणि डस्ट प्रूफ आहे. एकूण दोन कॅमेर्यासह 3,000 एमएएच बॅटरी मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी एक्सकोव्हर 5 चा तपशील जाणून घेऊ…
१ ) या स्मार्टफोनमध्ये 5.3 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 1480 x 720 पिक्सेल आहे. त्याचे आस्पेक्ट रेशो 16: 9 आहे. यात ऑक्टा-कोर एक्सिनोस 850 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देखील आहे, जो मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढविला जाऊ शकतो.
२ ) कंपनीने या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 16 एमपी कॅमेरा दिला आहे. तर समोर 5MP चा सेल्फी कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 3,000 एमएएच बॅटरी आहे, जी 15 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या व्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये पोगो पिन, 4 जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यासारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
३ ) सॅमसंग गॅलेक्सी एक्सकोव्हर 5 या स्मार्टफोनची किंमत सुमारे 33,300 रुपये आहे. हा हँडसेट सिंगल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हा भारतासह इतर देशांमध्ये सादर केला जाणार असून तो गेल्या महिन्यात लाँच झाला आहे. दरम्यान, सॅमसंगने मागील महिन्यात भारतीय बाजारात गॅलेक्सी एम02 स्मार्टफोन बाजारात आणला. या फोनची प्रारंभिक किंमत 6,999 रुपये आहे.