नवी दिल्ली – इतिहासातील अनेक राजे, सम्राटांबद्दल आणि त्यांच्या रंजक कथांबद्दल ऐकले आहे. असे काही राजे आहेत ज्यांच्या थरारक कथा देखील प्रसिद्ध आहेत. ज्युलियस सीझर त्यापैकी एक. रोमचा तिसरा सम्राट म्हणून त्याची ओळख आहे. तो जगातील सर्वात विचित्र हुकूमशहा म्हणून ओळखला जातो. ज्युलियस सीझरने स्वतःला रोमची देवी मानल्या जाणार्या व्हीनसचा वंशज असल्याचा दावा केला होता. असे म्हणतात की ज्यूलियस सीझरच्या शरीर यष्टीमुळे बरेच जण त्याची तुलना बकरीशी करत. म्हणून जेव्हा कोणी त्याच्यासमोर शेळीचा उल्लेख करीत असे, तेव्हा त्यास तो फाशीची शिक्षा सुनावत असे. तशा नोंदीही विविध ठिकाणी आहेत.
असे म्हटले जाते की, सम्राट ज्यूलियस सीझरला लांब केसांचा तिरस्कार होता आणि म्हणूनच त्याने साम्राज्यात कोणत्याही लांब केसांचा माणूस पाहिला की त्यास ताबडतोब टक्कल करावे लागे. ज्युलियस सीझरला घोडे फार आवडत होते. त्याच्या प्रिय घोड्याचे नाव इन्सिटॅटस होते आणि त्याला तिच्यावर खूप प्रेम होते. तिच्या राहण्यासाठी सीझरने एक सुंदर घरही बांधले होते. नंतर, त्याचे घोड्यांवरील प्रेमाचे वेड बदलले. या क्रेझमुळे त्यांनी एकदा घोड्याला राज्यमंत्री केले. असे म्हणतात की, ज्युलियस सीझरला सोनेही पसंत होते म्हणूनच त्याने अधिकाधिक सोन्याचे दागिने घेतले. सोन्याच्या दागिन्यांनी आणि नाण्यांनी भरलेल्या बाथटबमध्ये तो आंघोळ करत असे.