मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका. टीआरपीमध्ये ही मालिका नेहमीच वरच्या स्थानावर असते. यातील कलाकार प्रेक्षकांना नेहमीच जवळचे वाटतात. त्यामुळेच त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.
या मालिकेतील माधवी भाभी अर्थात अभिनेत्री सोनालिका जोशी हिने तिच्या खऱ्या आयुष्यातील पतीची तिच्या चाहत्यांना ओळख करून दिली आहे. माधवी भाभी ही या मालिकेतील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा. ती सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर तिचे २ लाखांहून अधिक चाहते आहेत. सोनालिकाने नुकताच तिचा आणि तिचे पती समीर जोशी यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या लग्नातला असावा. लग्नाला १९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा फोटो शेअर करत असल्याचे तिने सांगितले. आजही आम्ही एकमेकांसोबत तेवढेच खुश आहोत.
सोनाली ही एका मराठी परिवारातून असून सुरुवातीच्या काळात तिने रंगभूमीवर काम केले आहे. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली.