मुंबई – सध्याच्या आजारपणाच्या काळात प्रत्येक जण आपल्या तब्येतीची काळजी घेताना दिसतो आहे. यात सेलिब्रिटी देखील मागे नाहीत. अनेक बाबतीत तर हे सेलिब्रिटी आपले रोल मॉडेल असतात. त्यामुळे त्यांच्यासारखंच वागण्याचा आपला हट्ट असतो. यामुळेच बहुधा अभिनेत्री कतरीना कैफ हिने आपला फिटनेस मंत्रा शेअर केला आहे.
नुकताच तिने आपला वर्क आऊटचा व्हिडीओ शेअर केला असून त्याखाली फिटनेस मंत्रा पण आहे. ईट, स्लीप, ट्रेन अँड रिपीट असा तिचा फॉर्म्युला आहे. कतरिनाने शेअर केलेल्या फोटोत तिने पांढरा टी शर्ट आणि काळी पॅन्ट घातली आहे. वर्कआऊट करून ती घामेजलेली दिसते आहे. तिचे चाहते हा फोटो पाहून खूप खुश आहेत. विना मेकअपही ती अत्यंत सुंदर दिसते आहे. तिच्या फोटोवर अनेक वेगळ्या कॉमेंट्स आल्या आहेत. वर्कआऊट शिवाय कतरिना डान्सचे व्हिडीओ देखील शेअर करत असते.
मध्यंतरी कतरिना आणि सलमान खानचा एक फोटो व्हायरल झाला होता. टायगर 3 चित्रपटाचे शूटिंग त्यांनी सूरु केले असून त्यातलाच हा फोटो असावा, असा अंदाज होता. या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये कतरिना झळकणार आहे.
कतरीना आणि अभिनेता विकी कौशल हे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. पण या दोघांनी अद्याप यावर काहीही भाष्य केलेले नाही. पण त्यांच्या फॅन्सना मात्र ही जोडी फारच पसंद पडली आहे.