नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतो. त्याच्या पोस्टदेखील खूप मजेशीर असतात. नुकताच इंस्टाग्रामवर त्याने एक फोटो शेअर केला आहे. त्यात आयुष्मान आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप परस्परांपासून अंतर ठेवून उभे राहिलेले दिसत आहेत. आम्ही दोघे सोशल डिस्टनसिंग मेंटेन करत असल्याची कॅप्शन त्याने या फोटोला दिली आहे. अर्थात हे सगळं त्याने मस्करीत म्हटलं आहे.
ब्लॅक आऊटफिटमध्ये आयुष्मान एकदम हँडसम, तर ताहिरा देखील ग्रे आऊटफिटमध्ये सुंदर दिसते आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये आयुष्मान म्हणतो की, काय दिवस आले आहेत, बायकोपासून देखील अंतर ठेवावे लागते आहे.
याआधी ताहिराने एक फोटो असा शेअर केला होता. डेटिंगच्या पहिल्या वर्षातही आम्ही सोशल डिस्टन्सिंगवर विश्वास ठेवला होता.
आयुष्मान सध्या चंदिगढ येथे आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करतो आहे. यात त्याच्यासोबत वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे.