नवी दिल्ली – दिल्ली शहरात वाहनांच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स आणि कलर-कोडड स्टिकर्स प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग दि. १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच याची होम डिलिव्हरी ग्राहकांना सोयीची होईल.
दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या प्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर वाहन मालकांना सहज एचएसआरपी मिळू शकेल. या बाबतची अधिक माहिती अशी की, ग्राहकांना उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट्सच्या होम डिलिव्हरीसाठी सुमारे 200 रुपये द्यावे लागतील. उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) आणि कोडेड स्टिकर्स लागू करण्याच्या प्रक्रियेची माहिती एसएमएसद्वारे पाठविली जाईल. वाहनांच्या सामान्य नोंदणी प्लेट्सची समस्या अशी होती की, त्यांच्यात सहज बनावट प्रकार केला जाऊ शकतो. वाहन चोरी झाल्यावर हे बदलले गेले आणि मग वाहनांमध्ये नवीन नंबर प्लेट्स आणल्या गेल्या परंतु एचएसआरपीद्वारे हे करता येणार नाही. जर आपले वाहन चोरले गेले असेल आणि त्याचे एचएसआरपी खराब झाले असेल तर नवीन एचएसआरपी फक्त तेव्हाच स्थापित केली जाऊ शकते ,जेव्हा वाहनाची संपूर्ण कागदपत्रे दिली जातीलही नंबर प्लेट बसविण्यामागील हेतू म्हणजे वाहनांवर नजर ठेवणे आणि वाहन चोरीच्या घटना कमी करणे, नवीन उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स दाखल झाल्यामुळे आपली वाहने पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील.