हाथरस – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्यांची सुटका झाली. हाथरस बलात्कार व हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी गेले असतांना नियमांचा भंग केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. अटक करतेवेळी कोणत्या कलमांचा आधार घेत असल्याचा प्रश्न राहुल गांधी यांनी पोलिसांना विचारला असता कलम १४४ लागू असल्याने पुढे जाता येणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना काही अटीवर सोडण्यात आले. हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला गेल्या होत्या. मात्र त्यांचा पोलिसांनी अडवले. त्यानंतर त्यांनी यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी चालण्यास सुरवात केली. मात्र त्याचवेळी त्यांना अडवण्यात आले व अटक करण्यात आली. त्याचवेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. दरम्यान, या अटकेमुळे काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून देशभर त्याचे पडसाद उमटले आहे. नाशिक जिल्हयात येवला, मालेगाव सह विविध ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला.