मनमाड – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या घटनेचे पडसाद मनमाड शहरात दिसून आले. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन युवा संघ यांनी संयुक्तरीत्या मोर्चा काढून मंडल अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून यावेळी तीव्र निदर्शने करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच उत्तर प्रदेशात होत असलेले अत्याचार पाहता सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, पी. आर. निळे, कादिर शेख, कैलास शिंदे, यशवंत बागुल, संतोष भोसले, उमेश भालेराव, कुणाल निरभवणे, सुरेश जगताप, कैलास गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.