हाथरस (उत्तर प्रदेश) – येथील तरुणीच्या हत्याकांडप्रकरणी पीडित कुटुंबिय सोमवारी (१२ ऑक्टोबर) अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात सुनावणीसाठी हजर राहणार आहेत. त्यांचा जबाब ते नोंदवणार आहेत. या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेत हे कुटुंब लखनऊकडे प्रयाण करणार आहे. ५०हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच सीसीटीव्ही यांची नजर या सर्व परिस्थितीवर राहणार आहे. त्यामुळे आजच्या सर्व घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, हे कुटुंब न्यायालयात काय जबाब देतात याकडेही सगळ्यांच्या नजरा लागून आहेत.