हाथरस (उत्तर प्रदेश) – येथील सामुहिक बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने शुक्रवारी मोठा निर्णय घेतला. पोलिस अधिक्षक विक्रांतवीर सिंह यांच्यासह एकूण ७ पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, पीडिताचे कुटुंबिय आणि आरोपी यांची नार्को टेस्ट करण्याचा निर्णयही सरकारने जाहीर केला आहे.
प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ७ पोलिसांचे निलंबन केले आहे. क्षेत्रिय अधिकारी (सीओ) राम शब्द, पोलिस निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, उपनिरीक्षक जगवीर सिंग व महेश पाल यांचा त्यात समावेश आहे. सरकार माता भगिनींच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे योगी यांनी म्हटले आहे. याप्रकरणी सत्य शधून काढण्यासाठी पीडितेचे कुटुंबिय, आरोपी आणि पोलिस यांची नार्को टेस्ट केली जाणार असल्याचे अप्पर मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांनी सांगितले आहे.
देशभरत संतापाची लाट
सामुहिक बलात्कार प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने, आंदोलने होत आहेत. कुठे कँडलमार्च तर कुठे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले जात आहे.