नाशिकरोड – हाथरथ येथील वाल्मिकी समाजाच्या मुलीवर अत्याचार केलेला आरोपीना मृत्यृदंडाची शिक्षा दयावी या मागणीसाठी नाशिक रोड येथील विभागीय महसुल आयुक्त व मुख्यमंत्री सहायता कक्षात भारतीय बाल्मिकी समाज, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, महाराष्ट्रीय चर्मकार संघर्ष संघटना, पीपल्स रिपब्लीकन पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनांत म्हटले की, उत्तर प्रदेश येथील हाथरस भागातील वाल्मिकी समाच्या १९ वर्षीय मुलीवर चार नराधमांनी अत्याचार करून तीचा पाठीचा कणा मोडून काढला, जीभ कापली, असे अमानवी कृत्य करत तीचे हाल करुन जीवे मारण्यात आले. तसेच यात वैद्यकीय, पोलीस, प्रशसाकीय यंत्रणा यांनीही संवेदन शुन्यता व हलगर्जीपणा दाखवित सर्व प्रकरण हाताळले, हा घटनाक्रम अत्यंत संतापजनक आहे. तरी यातील अरोपीना तातडीने मृत्यृदंडाची शिक्षा दयावी. सदर प्रकरण दडपण्यासाठी मुलीचे आई, वडील व भाऊ यांना घरात डांबून मध्यरात्री मृतदेह जाळणा-्या यंत्रणेवरही तातडीने कारवाई करावी. तसेच उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करावे या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार बबनराव घोलप, सुरेश मारु, शशिकांत उन्हवणे, दत्तात्रय गोतीसे, संजय कल्याणी, विक्रम कदम, महेंद्र आहिरे, सुनिल मेहरोलिया, राणा पारचा, संजय खरालिया, सोनु बहिनवाल, विशाल हाडा, नितीन जगताप, नितीन पंडित, आदित्य कुलकर्णी, रविंद्र कसबे, दिपक बेद, राहुल चटोले,अनुप बहोत, रॉनी लव्हेरी आदि उपस्थित होते.