मुंबई – हातापायांना अचानक येणाऱ्या मुंग्याचे प्रमाण वरचेवर वाढत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ही स्पाईन स्ट्रोकची लक्षणे असू शकतात.
मेंदूला इजा
स्पाईन स्ट्रोक हा ब्रेन स्ट्रोक पेक्षा वेगळा असतो. ब्रेन स्ट्रोक मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्याला बाधित करून मेंदूला प्रभावित करतो तर स्पाईन स्ट्रोक हा मणका म्हणजेच स्पायनल कॉर्ड ला प्रभावित करतो. स्पायनल कॉर्ड हा सेन्ट्रल नर्व्हस सिस्टम म्हणजेच केंद्रीय मज्जासंस्थेचा एक भाग आहे. यात मेंदुचादेखील समावेश आहे. असे असले तरीही स्पाईन स्ट्रोकच्या घटना ब्रेन स्ट्रोक पेक्षा कमी असतात. एकूण स्ट्रोक्सपैकी केवळ २ टक्के स्ट्रोक हे स्पाईन स्ट्रोक असल्याचे डॉक्टर्स सांगतात. स्पाईन स्ट्रोकमुळे मेंदूला संदेश पोचवणारे नर्व्ह इंम्पल्स संदेश पाठवण्यास समर्थ राहत नाहीत. हे नर्व्ह इम्पल्स शरीराच्या विविध हालचाली जसे की हात आणि पाय यांची हालचाल यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.
मज्जातंतूंचे नुकसान
जेव्हा रक्तप्रवाह बाधित होतो तेव्हा स्पायनल कॉर्डला रक्त तसेच ऑक्सिजनचा पुरवठा योग्य त्या प्रमाणात मिळणे बंद होते. त्यामुळे मज्जातंतूंचे नुकसान होते. अर्थातच यामुळे स्पायनल कॉर्डमधून पाठवल्या जाणाऱ्या संदेशांमध्येसुद्धा बाधा निर्माण होते. स्पाईन स्ट्रोकच्या परिस्थितीत रोग्याला योग्य वेळी योग्य उपचार प्राप्त न झाल्यास अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो, रोगी गंभीर परिस्थितीत कोमातही जाऊ शकतो. मात्र योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यास पूर्णपणे ठीक होणेदेखील शक्य आहे.
ही असतात लक्षणे
स्पाईन स्ट्रोकचे लक्षण आधीपासून दिसून येत नसल्यामुळे आपण सावध राहणे हाच त्यावरचा उपाय आहे. हातापायाला वारंवार मुंग्या येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कधीकधी पाय किंवा हात जड पडणे, हालचाल करणे शक्य न होणे, कधीकधी श्वास घेण्यास त्रास होणे, गळल्यासारखे वाटणे, शरीरात कडकपणा येणे, इत्यादी स्पाईन स्ट्रोक ची लक्षणे असू शकतात. अशावेळी डॉक्टरचा सल्ला वेळेत घेणे आवश्यक असते. बरेचदा औषधोपचारांच्या माध्यमातूनच स्पाईन स्ट्रोक बरे होतात. कधीकधी सर्जरीचा उपाय करावा लागतो.