नवी दिल्ली – भोजपुरी सिनेमाचा सुपरस्टार खेसारीलाल यादव हा ऐकेकाळी हातगाडी चालवायचा. त्यां अनोखा जीवन प्रवास सर्वांना प्रेरणादायी आहे.
बिहारमधील सीवान येथे जन्मलेले खेसारीलाल यादव यांना चाहत्याकडून सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशातूनच नाही तर परदेशातून सुध्दा चाहत्यांनी खेसारीलाल यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
केवळ यूपी-बिहारच नाही तर परदेशातही त्यांच्या चाहत्यांची संख्या लाखो-कोटींमध्ये आहे. खेसारीलाल यांचा यशाचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. सुमारे दशकांपूर्वी खेसारीलाल यादव हे बिहारमधील छपरा जिल्ह्यात दूध विकत असत.
काही महिने नोकरी केल्यानंतर ते दिल्लीला आले, येथे आल्यावर त्यांनी संगीत अल्बम मिळवण्यासाठी अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या फेऱ्या मारल्या. दोन दोन दिवस उपाशी राहावे लागले. म्हणून त्यांनी दक्षिण दिल्लीतील ओखला भागात लिट्टी-चेखा दुकान सुरू केले. या दुकानात ते आपल्या ग्राहकांना गाणी गाऊन दाखत असत.
खेसारीलाल यांनी आपल्या गायन आणि अभिनयाच्या जोरावर अनेक ज्येष्ठ भोजपुरी कलाकारांच्या सोबत काम आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात भोजपुरी फिल्म ‘साजन चले ससुराल’ पासून केली असून या चित्रपटासाठी त्यांना केवळ ११ हजार रुपये मिळाले.
मात्र आता मोठ्या मेहनतीने त्यांनी भोजपुरी सिनेमात स्वत: चे स्थान निर्माण केले असून सध्या ते भोजपुरी चित्रपटाचे सुपरस्टार आहेत. एका चित्रपटासाठी ते आता किमान ४० ते ५० लाख रुपये घेतात. तसेच स्टेज शोसाठी १५ लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारतात.