नवी दिल्ली – बीग बी अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच अॅटीव्ह असतात. आपल्या चाहत्या रसिकांसाठी फोटो आणि कमेंट करीत संवाद साधतात. सध्या त्यांनी उणे ३३ डिग्री तापमानात, हाडे गोठणाऱ्या थंडीत जाऊन लडाखमध्ये शूट केले आणि तिथे जाण्याचा आपला अनुभव त्यांनी शेअर केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी तेथील आपल्या अनुभवावरून सोशल मीडियावर लिहिले की, दिवसभर काम करून मी लडाखला परत आलो आहे. इथलं तापमान उणे ३३ डिग्री आहे. असं वाटत होतं की थंडी आपल्याला गोठून टाकेल. विशेष म्हणजे यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांनीही आपला फोटो शेअर केला आहे.त्यात ते हिवाळ्यामध्ये परिधान केलेले दिसतात. तसेच बच्चन यांनी पुढे असेही म्हटले आहे की, सर्व काही परिधान करूनही येथे आपण थंडीपासून वाचू शकत नाही.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या फोटोवर एका चाहत्यांनी भाष्य केले आहे की, वयाच्या ७८ व्या वर्षीही तुम्ही किती सक्रिय आहात? अमिताभ बच्चन आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत संपर्कात राहतात आणि आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहतात. अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी आणखी एक फोटो शेअर केला होता. हा फोटो १९९० चा असून रशियातील मॉस्कोला गेले असता तेथे काढलेला आहे.