नवी दिल्ली – उत्तर आणि दक्षिण भारतातील काही भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आता वेगाने वारे वाहू लागले आहेत. देशात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान अशा अनेक ठिकाणी रात्री तापमान कमी होत आहे. हवामानातील या बदलांमुळे आगामी महिनाभर कडक ऊन आणि रात्री थंडी अनुभवास येणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार स्पष्ट करण्यात येत आहे की, संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात असेच विषम वातावरण असणार आहे, जेव्हा आकाश स्वच्छ व सूर्यप्रकाश तीव्र असेल, तेव्हा दिवस उकाडा असेल आणि रात्री थंडीचा प्रभाव वाढेल. याखेरीज या महिन्याच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरूवातीस डोंगराळ भागात बर्फवृष्टी होऊ शकते, असे या विभाग म्हटले असून येत्या महिन्यापर्यंत डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात हिवाळ्यात थंडीची तीव्रता वाढले.
त्याच वेळी, उत्तरेकडून उंच डोंगरावरुन येणाऱ्या शीतलहरीमुळे, तापमानही दिवसा कमी होण्यास सुरवात होईल.
हवामानाशी संबंधित खासगी संस्थेच्या मते, यंदा परिस्थिती असू शकते, हिवाळ्याचा हंगाम बराच काळ टिकेल आणि थंडी देखील खूप वाढू शकते. हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, हवामान बदलाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. तर वैज्ञानिक महेश पलावत म्हणतात की, दिल्ली-एनसीआर मधील किमान तापमान 20 डिग्री सेल्सियस आहे. त्या शिवाय त्यांनी सांगितले की, येत्या दोन आठवड्यांत हे तापमान 16 ते 17 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. यानंतर, आठवड्यातून एक किंवा दोन अंश तापमान कमी होईल. त्याशिवाय हवामान तज्ज्ञ डॉ. डीएस पै म्हणाले की, हवामान बदलांमुळे नुकसानकारक घटना वाढल्या आहेत, म्हणजेच मान्सून आणि उष्णतेचा एकाच भागात वेगवेगळा परिणाम होतो.