नवी दिल्ली – तुम्हाला भारतीय हवाई दलात जायची इच्छा आहे का? तर मग ही संधी निश्चितच तुमच्यासाठी आहे. हवाई दलाने वर्ग क, सिव्हीलियनसाठी भरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. याअंतर्गत मल्टीटास्किंग एमटीएस, हाऊस कीपिंग स्टाफ, एलडीसी, क्लार्क, हिंदी टायपिस्ट, स्टेनोग्राफर श्रेणी दुसरी, स्टोअर सुपरिटेंडंट, स्टोअर कीपर, कार्पेंटर आणि पेंटरसह अन्य २५५ पदांसाठी ही भरती होणार आहे.
ज्यांना यासाठी अर्ज करायचा आहे, त्यांना १३ मार्चपर्यंत ही संधी उपलब्ध आहे. भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. फक्त अर्ज भरताना काळजीपूर्वक भरा, अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल.
पात्रता काय
मल्टीटास्किंग ऑफिसर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावीपर्यंत शिकलेला असावा. एलडीसी, क्लार्क, स्टोअर कीपर हिंदी टायपिस्ट या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे बारावी पास असावेत.
याशिवाय अर्जदाराचा टायपिंग स्पीड प्रति मिनिट ३० शब्द (इंग्रजी) एवढा असावा. स्टोअर सुपरिटेंडंट पदासाठी पदवीधर उमेदवाराची अट आहे. कुकच्या पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे मान्यताप्राप्त बोर्डाचे १० वी पास झाल्याचे प्रमाणपत्र अथवा फूड डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रातील एका वर्षाचा अनुभवही असावा.
किती जागा
मल्टीटास्किंग ऑफिसर – ७०
हाऊसकीपिंग स्टाफ – ४९
एलडीसी – ११
क्लर्क हिंदी टायपिस्ट – २
स्टेनोग्राफर – ३
कार्पेंटर – २
स्टोअर कीपर – ३
पेंटर – ४
सिव्हिलिअन मेकॅनिकल ट्रान्स्पोर्ट ड्रायव्हर – ९
कुक – ४१
फायरमॅन – ८