अंबाला (हरियाणा) – एखाद्या वेळी शासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष खूप नुकसानकारक ठरू शकते, याचे एक उदाहरण रेल्वे विभागात दिसून आले. त्याचे असे झाले की, रेल्वे विभागाने ४ वर्षानंतर लक्षात आल्यावर एक तिजोरी उघडली त्यात नोटाही निघाल्या, पण त्या आता चलनातून बाद झाल्या होत्या, त्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
चार वर्षापूर्वी नवी दिल्लीहून अंबला रेल्वे स्थानकात सुमारे तीन लाख रुपयांची रोकड असलेली तिजोरी घेऊन पॅसेजर गाडी निघाली, पण तेथे कोणी तिजोरी उतरविलीच नाही, त्यामुळे ही तिजोरी कालका स्थानकात पोहोचली.
येथे ही तिजोरी (लॉकर ) कित्येक महिन्यांपासून कालका रेल्वे स्थानकावर पडून होती. दरम्यानच्या काळात नोटाबंदी झाली. कित्येक महिन्यांनंतर अधिकाऱ्यांना ही तिजोरी आठवली. त्यांनी ती उघडली, तेव्हा त्यात ठेवलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा होत्या, त्या आता नोटा बंदीमुळे निरुपयोगी झाल्या होत्या.
दरम्यान, अंबाला विभागातील अधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. अंबाला कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकात पार्सल विभागातील कर्मचारी कर्तव्य बजावत असल्याचे तपासात आढळले की, दि. 25 ऑक्टोबर 2016 रोजी दिल्ली ते अंबालासाठी पॅसेंजर ( गाडी क्रमांक 54303 ) मध्ये ही तिजोरी ठेवण्यात आली होती.
आता ही तिजोरी पुन्हा दिल्लीला पोहोचली असून दिल्लीत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोख रक्कम उघडली आणि जमा केली. सुमारे तीन लाख रुपये रोख असल्याचे म्हटले जाते, परंतु 500-1000 रुपयांच्या नोटा निरुपयोगी झाल्या आहेत. तसेच सुमारे दोन क्विंटल वजनाची या तिजोरीची किल्ली दिल्लीच्या कर्मचार्यांकडे आहे.