हरिद्वार येथील कुंभमेळ्यात पट्टाभिषेक सोहळा उत्साहात
हरिद्वार : ध्यानयोगी म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेल्या उत्तम स्वामीजी यांना पंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर बनले आहेत. सर्व आखाड्यांच्या प्रमुख महंतांच्या उपस्थितीत उत्तम स्वामीजी यांना हरिद्वारच्या कुंभमेळ्यात सनातनधर्म पद्धतीने पट्टाभिषेेक करण्यात आला.
हरिद्वार येथे सध्या कुंभमेळा सुरू आहे. सर्व प्रमुख १३ आखाड्यांचे भारतभरातील प्रमुख आचार्य महामंडलेश्वर, श्री महंत व महंत हरिद्वार येथे जमले आहेत. आतापर्यंत कोणत्याही आखाड्याशी संबधित नसलेले मुळचे महाराष्ट्रातील, पण सध्या राजस्थानमधील बासवाडा येथे वास्तव्य असलेले ध्यानयोगी उत्तम स्वामीजी यांचा भारतभर व विदेशातही भक्त परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, सरसंघचालक मोहन भागवत, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, पुणे येथील एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड, माजी मंत्री प्रशांत हिरे, उद्योेगपती गणपत कोठारी, मुकेश कापडीया, कन्हैयालाल जोशी, रमेश पटेल, लिलावती हॉस्पिटलचे संचालक रश्मी व राजीव मेहता, भरत शहा, उपसना खंडेलवाल आदी मान्यवर स्वामीजींच्या संपर्कात आहेत. बासवाडासह हरिद्वार, उज्जैन, सलकनपूर, लोहगाव, मंदसौर येथे त्यांचे आश्रम आहेत. त्या माध्यमातून अनाथांसाठी शाळा, आरोग्य सेवा, अन्नदान आदी अनेक सेवाकार्य चालवले जातात.
हरिद्वार येथील पट्टाभिषेक सोहळ्यास पंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर रामकृष्णानंद, सभापती महंत मुक्तानंद ब्रम्हचारी महाराज, महामंत्री महंत सोमेश्वरानंद महाराज, आचार्य महामंडलेश्वर ब्रह्मर्षी रामकृष्णानंद, सचिव संपूर्णानंद महाराज, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज, महामंडलेश्वर माँ कनकेश्वरी देवी, द्वारिका सनातनी सेवामंडलाचे केशवानंदजी महाराज, रामजन्मभूमी न्यासाचे सचिव चंपकराय, मुक्तानंद यांच्यासह १३ आखाड्यांचे प्रमुख साधुमहंत यांच्यासह भक्तपरिवार उपस्थित होते. रामबाबा यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
महामंडलेश्वर ईश्वरानंदजी
ध्यानयोगी स्वामी उत्तम स्वामीजी यांना पंचअग्नी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर झाल्याने त्यांना आता महामंडलेश्वर ईश्वरानंदजी म्हणून ओळखले जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र गुरुभक्त मंडळाचे अध्यक्ष संजय नागरे यांनी दिली.