नवी दिल्ली – अलीकडे मोबाइल म्हणजेच आपले सगळे काही असते. त्यामुळेच त्यात आपला बराच खाजगी डेटा असतो. बँकांचे व्यवहार ऑनलाइन करत असल्याने त्याचीही माहिती असते. म्हणूनच फोन चोरीला गेला तर आपल्याला धडकीच भरते. तुमच्याबरोबर असे काही झाले असेल, तर घाबरू नका. आम्ही तुम्हाला अशी एक युक्ती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही हरवलेल्या मोबाइलमधील डेटा घरबसल्या डिलीट करू शकता.
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://mydevices. google.com वर जा. तिथे गेल्यावर, ज्या जीमेल आयडीने तुम्ही मोबाइलवर लॉग इन केले होते, त्या आयडीने लॉग इन करा. तिथे तुम्हाला प्ले साऊंड, सिक्युअर डिव्हाईस आणि इरेज डिव्हाईसचा पर्याय दिसेल. इरेज डिव्हाईसचा पर्याय निवडा. त्यानंतर आपला जीमेल आयडी आणि पासवर्ड टाका. हे केल्यावर जुन्या मोबाइलमधील तुमचा सगळा डेटा डिलीट होईल.
हे वाचून तुम्हाला जरा रिलीफ वाटला असेल. पण यात एक छोटी अडचण आहे. ती म्हणजे हे सगळं तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाइलचे नेट सुरू असेल.