नवी दिल्ली – अभिनेता हरमन बवेजा नुकताच साशा रामचंदानी सोबत विवाह बंधनात अडकला. अत्यंत शाही अशा या विवाह सोहळ्याचे फोटोज, व्हिडीओज आता व्हायरल होत आहेत. तसेच हरमनचा मित्र राज कुंद्रा यांनीही संगीत समारोहाचे अनेक फोटोज शेअर केले आहेत. याआधी रविनाने प्री वेडिंग तयारी आणि समारंभाचे फोटो शेअर केले होते.
गुलाबी रंगाची शेरवानी घातलेला आणि पगडी बांधलेला हरमन फारच खुश दिसत आहे. या समारंभात उपस्थित असलेले राज कुंद्रा सतत या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर टाकत होते. ‘हरमनचे लग्न’ असा टॅग टाकून त्यांनी हे सगळे फोटो शेअर केले आहेत. यात हरमनच्या परिवारासोबत राज कुंद्रा, आमीर अली, आशिष चौधरी आणि त्यांची पत्नी समिता बंगार्गी हे सगळे दिसत आहेत. सगळेच मस्तपैकी नाचगण्यात मग्न असून नंतर या साऱ्यांनी हरमनसोबत फोटोही काढले आहेत.
https://www.instagram.com/tv/CMq4LjAnzyA/?utm_source=ig_web_copy_link
हरमन बवेजा याची पत्नी साशा एक न्यूट्रिशनिस्ट आहे. २०२० मध्ये हरमनच्या रोकाचे फोटोही प्रसिद्ध झाले होते. ‘लव्ह स्टोरी २०५०’ या चित्रपटातून हरमन याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. २००८ मध्ये आलेल्या या चित्रपटात त्याच्या सोबत प्रियांका चोप्राचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यानंतर प्रियंकासोबत आलेला त्याचा ‘व्हॉटस युवर राशी’ हा चित्रपटही गाजला होता. त्यानंतर बराच काळ त्याला काम न मिळाल्याने तो चर्चेत नव्हता. या लग्नाच्या निमित्ताने पुन्हा त्याची चर्चा सुरू झाली आहे.
https://www.instagram.com/p/CMrUx2vH2tK/?utm_source=ig_web_copy_link