नवी दिल्ली – सध्या सुरू असलेली कोविड-19 महामारी आणि त्याचा वयोवृद्धांना असलेला धोका लक्षात घेऊन कर्मचारी भविष्यनिधी कार्यालयाने, जे निवृत्तीधारक आपले निवृत्तीवेतन ईपीएस १९९५ या द्वारे मिळवितात आणि ज्यांचे जीवन प्रमाणपत्र २८ फेब्रुवारी २०२१ च्या आधी कोणत्याही महिन्यात देण्यालायक असेल,अशा निवृत्तीधारकांना आपले जीवन प्रमाणपत्र (JPP) सादर करण्यासाठी दिलेली मुदत दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढविली आहे.सध्या निवृत्तीवेतन धारक हे प्रमाणपत्र वर्षभरात दिनांक ३० नोव्हेंबर पर्यंत कधीही सादर करू शकत होते, जे निर्गमित केल्यापासून एक वर्षाच्या कालावधीपर्यंत वैध असते.
असे सर्व निवृत्तीवेतनधारक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील. हे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3.65 लाख सामान्य सेवा केंद्रे (CSCs), निवृत्तीवेतन वितरीत करणाऱ्या बँकेच्या शाखा, टपाल विभागाअंतर्गत येणारी 1.36 लाख टपाल कार्यालये,1.90 लाख पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्या मार्फत निवृत्तीवेतनधारकांना पाठविता येते. ज्या निवृत्तीवेतन धारकांनी आपले जीवन प्रमाणपत्र 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर केले नाही, या वाढीव कालावधीमध्ये अशा 35 लाख कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन थांबविले जाणार नाही.
निवृत्तीवेतन धारक आपल्या जवळचे सामान्य सेवा केंद्र शोधण्यासाठी लिंक – https://locator.csccloud.in/
आपले जीवन प्रमाणपत्र आपल्या घरातून सुलभपणे किंवा इतरत्र कोठूनही, जवळच्या टपाल कार्यालयातून आँनलाईन पध्दतीने पाठविण्यासाठी-(http://ccc.cept.gov.in/covid/request.aspx )- या लिंक वर जाऊ शकतात.