नाशिक – कोरोना काळात ईपीएस १९९५ पेन्शन धारक तसेच एफपीएफ १९७१ चे पेन्शन धारकांना नोव्हेंबर-डिसेंबरच्या महिन्यात हयातीचा दाखला (LIFE CERTIFICATE) डिजिटल करून घेण्यासाठी आता गर्दी करण्याची गरज नाही. पेन्शन धारकांनी ज्या ठिकाणी आपणास सोईचे असेल तेथे खालील सूचना विचारात घेवून जीवन प्रमाणपत्र नोंदवून घ्यावे. असे आवाहन क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त एम.अशरफ यांनी केले आहे.
त्यासाठी खालील उपाय नाशिक भविष्य निधी कार्यालयाने दिले आहे.
– आपण आपले जीवन प्रमाणपत्र / हयातीचा दाखला वर्षभर केला जाऊ शकतो तो मागील जीवन प्रमाणपत्र ज्या तारखेला केले असेल त्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध आहे.
– ज्या पेन्शन धारकांनी जानेवारी २०२० नंतर जीवन प्रमाणपत्र दाखल केले असेल त्यांना एक वर्ष संपेपर्यंत जीवन प्रमाणपत्र भरण्याची गरज नाही.
– पेन्शनधारक त्याच्या घराच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रात (Common Service
Centre) मध्ये जाऊन जीवन प्रमाणपत्र नोंदवु शकतात. जीवन प्रमाणपत्र करण्यासाठी तीन लाखापेक्षा अधिक आपले सरकार सेवा केंद्रे (Common service centre) भारत सरकारने अधिकृत केलेली आहेत.
– आपल्या बँकेत देखील पूर्वी प्रमाणेच जीवन प्रमाणपत्र नोंदणी चालू आहेत तेथे पेन्शनधारक
आपले जीवन प्रमाणपत्र दाखल करू शकतात.
– ज्यांना पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) २०२० मध्ये देण्यात आले आहेत त्यांना जीवन प्रमाणपत्र देणे आवश्यक नाही.