नवी दिल्ली – किमान आधारभूत किंमत पद्धत रद्द करणार नाही, असे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांना दिलं आहे. ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मध्य प्रदेश किसान महासम्मेलनाला संबोधित करत होते.
केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षात देशातल्या शेतकऱ्यांसाठी मोठं कार्य केले असून यापुढे शेतकरी वर्ग मागास राहू शकणार नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना सहज आर्थिक निधी उपलब्ध होत आहे. मध्य प्रदेशातल्या ३५ लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १६०० कोटी रुपये जमा केल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्ष शेतकऱ्यांचा राजकारणासाठी वापर करत असून कृषीकायद्यातल्या अनेक गोष्टी विरोधकांच्या जाहीरनाम्यात यापूर्वीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कृषी कायदे काही एका दिवसात तयार झाले नाहीत. गेल्या २५ वर्षांपासून त्याची प्रक्रिया सुरू होती. आणि हे कायदे करण्याचे कामही आमच्याच सरकारने केल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे.