नाशिक – तालुक्यातील देवरगांवचे वारकरी हभप बापु महाराज पालवे यांचे ९२ व्या वर्षी सोमवारी (दि. २१ ) सायंकाळी पाच वाजता वैकुंठगमण झाले. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाचे एक चालती बोलती गाथा मुर्ती हरपली, असे वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर यांनी आपली भावना व्यक्त केली. तर जिल्हाउपाध्यक्ष माधव महाराज घोटेकर खेडलेकर म्हणाले, नाशिक जिल्ह्याची संत परंपरेतील बापु महाराज देवरगांवचे नाव भक्तीने वाढवले.
दरम्यान ,कार्याध्यक्ष हभप रामेश्वर महाराज शास्री, द्वाराचार्य हभप रामकृष्ण महाराज लहवीतकर,जिल्हा मार्गदर्शक प्रमुख हभप श्रावण महाराज आहिरे, मार्गदर्शक सदस्य हभप प्रल्हाद महाराज शास्री,मखमलाबादचे हभप बाळासाहेब महाराज काकड, तालुकाध्यक्ष हभप लहुजी महाराज आहिरे, युवा समिती जिल्हाध्यक्ष हभप संदिप महाराज खकाळे,जिल्हासदस्य हभप हिरामण महाराज देवरगांवकर, हभप पुंडलिकराव थेटे आदिंनी बापू महाराज यांना श्रध्दाजंली अर्पण केली आहे.