भुवनेश्वर (ओडिसा) – गंजम जिल्ह्यात एक अचंबित करणारे प्रकरण पुढे आले आहे. इथे एका ट्रक चालकाला 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र ज्या कारणासाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे, त्यामुळे हे प्रकरण वेगाने व्हायरल आहे. वाहतुक प्रशासनाने या ट्रक चालकाला हेल्मेट न घालता वाहन चालविल्याबद्दल 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
वाहतूक प्रशासनाचा असा कारभार यापूर्वीही अनेकदा उघडकीस आला आहे. मात्र, तरीही त्यातून धडा घेईल ते प्रशासन कसले. एएनआय वृत्त संस्थेने एका चालानचा फोटो प्रसिद्ध केला आहे. यामध्ये चालकाचे नाव, पत्ता तसेच गाडीचे डिटेल्सही दिले आहेत. चालानमध्ये दिलेल्या माहितीनुसार गंजम जिल्ह्यातील प्रमोद कुमार आपल्या वाहनाच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी गेले होते. तर त्यांच्या हातात परिवहन विभागाने हे चालान थोपवले. या चालानवर 1 हजार रुपयांचा दंड नमूद होता.
चालानच्या प्रतीवर 15 मार्च 2021 अशी तारीख होती आणि गाडीचा क्रमांकही होता. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद कुमारने अधिकाऱ्यांना चालान देण्याचे कारण विचारले तर त्याला हेल्मेटशिवाय गाडी चालविल्याबद्दल दंड असल्याचे सांगण्यात आले. आहे की नाही गंमत. एक ट्रक चालक वाहनाच्या परवान्याचे नुतनीकरण करायला गेला आणि त्याच्या हातात दंडाची पावती दिली.
असा आहे परिवहन विभाग
मुळात ज्या ट्रकच्या परवान्याचे नुतनीकरण करायला तो गेला होता तोच ट्रक बिना हेल्मेट चालविल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला. हेल्मेट घालून ट्रक चालवावा, असा शोधच परिवहन विभागाने लावला आहे, असे म्हटले तरीही चालेल.
https://twitter.com/ANI/status/1372360777114390531