नाशिक – कोरोना विषाणूमुळे सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेले पीपीई हे संरक्षण कीट आता चक्क चोरट्यांनीही आपलेसे केले आङे. त्यामुळेच काठगल्ली व जेलरोड येथील दोन सराफी दुकाने फोडण्याचा पराक्रम चोरट्यांनी चक्क पीपीई कीट घालूनच केला आहे. आपली ओळख पटू नये यासाठी हा उद्योग चोरट्यांनी केला खरा पण दुकानातील सर्व ऐवज तिजोरीत असल्याने या चोरट्यांना रिकाम्या हाती परतावे लागले आहे. काठेगल्लीतील मोहिनीराज ज्वेलर्स आणि जेलरोड येथील तेजस्वी ज्वेलर्सला चोरट्यांनी लक्ष बनविले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.