शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हताश न होता ती बनली टॅक्सीचालक; अनेकांसाठी प्रेरणादायी

by India Darpan
सप्टेंबर 7, 2020 | 11:14 am
in राज्य
0
Woman taxi driver 1140x570 1

मुंबई – लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने हताश न होता टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेणाऱ्या स्मिता झगडे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. टॅक्सीच्या ड्रायव्हिंग सीट वर असलेल्या स्मिता केवळ गाडी नव्हे तर महिला सक्षमीकरणाचे सारथ्य करत असल्याची भावना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. आज आपल्या निवासस्थानी मंत्री ॲड. ठाकूर यांनी स्मिता झगडे यांचा सन्मान केला.

मुंबईत राहणाऱ्या स्मिता झगडे गेली ७ वर्ष ड्रायव्हिंग स्कूलमधे चारचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देत होत्या. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये त्यांचा रोजगार बुडाला. ३ महिने कुठलीही कमाई नाही. एकल पालकत्वाची जबाबदारी. अशा सगळ्या परिस्थितीत स्मिता यांना आपल्या मुलीसाठी, संसारासाठी काहीतरी करणं भाग होतं. नोकरीच्या मागे न लागता, ड्रायव्हिंग ही आपली कलाच आपल्याला स्वयंपूर्ण करेल असा विश्वास बाळगत त्यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. याआधी इतरांना गाडी शिकवणं आणि आता स्वत: मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवणं हा प्रवास सोपा नव्हता. अनेकांनी त्यांना हे बाईचे काम नाही, यात पडू नये असे सल्ले दिले. पहिल्याच दिवशी १ हजार ५०० रुपयांच्या कमाईने त्यांचा आत्मविश्वास वाढला. शहर पूर्वपदावर आल्यावर सगळं सुरळीत होईल अशी आशा त्या बाळगतात.

आज राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सत्कार केल्याने स्मिता भारावून गेल्या. “ठाकूर मॅडमनी काही झालं तरी मागे फिरु नकोस, मी सदैव तुझ्या सोबत आहे असं सांगत मला आशीर्वाद दिला. आज मला मी योग्य निर्णय घेतला याची खात्री झाली” अशा भावना स्मिता यांनी व्यक्त केल्या. अजून एक टॅक्सी घेत त्याद्वारे एका महिलेलाच रोजगार देण्याची स्मिता यांची इच्छा आहे. वाहनचालक म्हणून काम करत आपण संसाराला नक्कीच हातभार लावू शकतो असा संदेश त्या महिलांना देतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पर्यटनासाठी आली आता ‘मोटोहोम कॅम्परव्हॅन’!

Next Post

स्वराज्य परिवाराच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

Next Post
IMG 20200906 WA0017

स्वराज्य परिवाराच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011