मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी यंदा हज यात्रेसाठी भारतातून जाणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल ,अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. आज मुंबईतल्या हज हाऊस इथं याबाबत भारतीय हज कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी आपण चर्चा केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.