नाशिक – सध्या कोव्हिडचे संकट सर्व राज्यात पसरले आहे. अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. तरीही या अडचणींवर मात करून नाशिकमधे होणारे साहित्य संमेलन आपण सर्वजण मिळून यशस्वी करूया असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. कोव्हीडमुळे सध्या रोज परिस्थिती बदलत आहे. संमेलनाच्या तारखेपर्यंत हि परिस्थिती निवळेल आणि संमेलन यशस्वी पार पडेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यासाठी संमेलनाचे समिती सदस्य, कार्यकारी मंडळ, हितचिंतक यांचे योग्य दिशेने प्रयत्न चालू आहेत. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील, कार्यवाह भगवान हिरे, निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगांवकर, सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, प्रमुख समन्वयक विश्वास ठाकूर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्रा. आर.पी. देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जागतिक मराठी भाषा दिन व कुसुमाग्रज जयंतीच्या निमित्ताने कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. सभेच्या सुरुवातीला प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगांवकर यांनी सर्वांचे स्वागत केले व प्रथम बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन केले. सभेने इतिवृत्ताला मंजुरी दिली. यानंतर कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी आत्तापर्यंत झालेल्या कार्याची माहिती दिली. संमेलनाचा प्रार्थमिक आराखडा तयार आहे. या परिसराला कुसुमाग्रजनगरी नाव दिले आहे. ३९ समित्यांचे काम शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्ण चालू आहे. पुस्तकप्रकाशन मंचाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १२० स्टॉल्स ची नोंदणी झाली आहे. कविकट्टासाठी तीन हजाराहून अधिक कविता आल्या आहेत. ग्रंथदिंडी कुसुमाग्रजनिवास ते डोंगरे वसतिगृह ते कुसुमाग्रजनगरी असा प्रवास करेल जिल्ह्यातील साहित्यिकांचा योग्य सन्मान राखला जाईल, कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेतल्या जातील. असे त्यांनी सांगितलं.
जयप्रकाश जातेगावकर यांनी आजपर्यंत झालेला खर्च सभेपुढे सादर केला. सभेने त्या खर्चास मंजुरी दिली. सहकार्याध्यक्ष श्री मुकुंद कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी मधुकर झेंडे, सुभाष सबनीस, रमेश देशमुख, किरण समेळ, प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, लोकेश शेवडे, यादव. विलास लोणारी, विजयकुमार मिठे, अभिमन्यू सूर्यवंशी, बी.जी.वाघ, श्रीकांत बेणी, डॉ. धर्माजी बोडके, ऍड. सौचे, प्रतिभा विस्वास, विजयालक्ष्मी मणेरीकर, प्रशांत कापसे, सुरेख बोऱ्हाडे, अशोक पाटील, दिलीप बारवकर, राजा वर्टी, डॉ.प्रा.संजय शिंदे प्राचार्य डॉ.पवार देवदत्त जोशी. गिरीश नातू मकरंद हिंगणे कार्यवाह सुभाष पाटील, कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर आणि अन्य स्वागत समिती सदस्य उपस्थित होते.