सुभाषित
सुभाषितचा हा दहावा दिवाळी अंक आहे. यंदा कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्राला फटका बसला, तसा दिवाळी अंकांना ही बसला सुभाषितची दशकपूर्ती होत असताना कोरोनाचे तीव्र संकट संपूर्ण जगावर होते, तसेच हे संकट अद्यापही आहे, परंतु त्याची तीव्रता कमी जाणवत आहे. या शतकात मानवाने सर्व क्षेत्रातील नवनवीन प्रगती केली आहे.
विविध क्षेत्रात जगाच्या उत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे सुरू आहे, अगदी चंद्रावर पहिल्यांदा पाऊल टाकले तेव्हापासून ते मंगळ सह अन्य गृहावर जाण्याच्या तयारीत आहोत, आधुनिक जगाचा प्रवास आपण अनुभवत असतानाच देशातील शास्त्रज्ञ संशोधक विविध आघाड्यांवर आपल्या ज्ञानाच्या अभ्यासाच्या जोरावर मिळताहेत. विज्ञान, कला, अर्थशास्त्र, ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक संशोधन व अभ्यास करीत आहेत.
या परिस्थित संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाने प्रत्येकाच्या मर्यादा स्पष्ट करून दाखवल्या आहेत. याबाबत शास्त्रज्ञ व मेडिकल सायन्स अभ्यासक हे सगळे या संकटापुढे जणू हतबल झालेले आहेत, आता कोरोनावरील लस येऊ घातली आहे. परंतु अद्यापही संकटाचे व नैराश्याचे वातावरण कायम आहे. अशा परिस्थितीत यंदा दिवाळी अंक मोठ्या प्रमाणात निघाले नाहीत. त्यातही सुभाषित चा दिवाळी अंक आगळा वेगळा दिसत आहे.
यंदा दिवाळी अंक आपल्या भेटीला येणार की नाहीत असे वाटत होते. कारण तेसुद्धा अस्तित्वाची लढाई लढत आहेत, त्याच्या अस्तित्वाच्या लढाईत सुभाषित दिवाळी अंक आपली दशकपूर्ती साजरी करत आहे. सर्व वाचक, जाहिरातदार, साहित्यिक, लेखक, कवी, चित्रकार, वितरक तसेच हितचिंतक यांच्या मागणीवरून आणि मार्गदर्शनानुसार यंदा काही दिवाळी अंक बाजारात आले, त्यात सुभाषित देखील आहे. याचे श्रेय संपादक सुभाष सबनीस यांना जाते.
यावर्षी अंकात सदानंद भणगे, भा.ल. महाबळ, रवींद्र भयवाल, नागेश शेवाळकर, डॉ. विनोद गोरवाडकर, उत्तम सदाकाळ, सचिन बेंडभर, सुरेश पोरे, बबन मोरे, राम लोखंडे या लेखकांबरोबरच अन्य लेखकांच्या वीस विनोदी कथा, कविता तसेच शिल्पा अग्निहोत्री यांचे वार्षिक राशिभविष्य, व्यंगचित्रे, चारोळ्या, वात्रटिका तसेच ज्ञानेश बेलकर यांचे बहुरंगी मुखपृष्ठ यामुळे अंक कोरोनाच्या परिस्थितीही बहारदार झालेला दिसत आहे.
लेखन- मुकुंद बाविस्कर
अंकाचे तपशील असे:
दिवाळी अंक – सुभाषित
संपादक – सुभाष सबनीस
संपर्क क्रमांक ९८८१२४८४२९
स्वागत मूल्य-१६o रुपये.