साहित्यदीप
साहित्यादीप प्रतिष्ठानच्या संस्थापक ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या संकल्पनेतून , यांच्या सुयोग्य नियोजनातून साहित्यादीप प्रतिष्ठान वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम घेऊन रसिकांच्या भेटीला येत असते. यात दिवाळी अंकाचा ही समावेश आहे. यावर्षीचा ‘साहित्यादीप’ हा साहित्यादीप प्रतिष्ठानचा दहावा दिवाळी अंक. डॉ. आश्विनी धोंगडे यांच्या हस्ते online प्रकाशन झाले. दरवर्षी साहित्यादीप प्रतिष्ठान दिवाळी पहाट आयोजित करून दिवाळी अंक प्रकाशित करत असते, यंदा प्रतिष्ठानने ऑनलाईन दिवाळी पहाट साजरी केली आणि अंकाचे प्रकाशन केले.
दिवाळी अंक कथा, कविता, वैचारिक लेखन यांनी सजलेला आहेच, पण यंदा ‘पडद्यावरील कलावंतांच्या कविता’ हा वेगळा विषय वाचकांना निश्चित आकर्षित करतो. हा विषय ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे.
पडद्यावरील कलाकार आपल्याला त्याच्या कलेने मोहित करतच असतो पण त्याचे इतर पैलू जाणून घेण्याचीही आपल्याला उत्सुकता असते.
साहित्यादीपच्या यंदाच्या दिवाळी अंकातून कलावंतांनी त्यांच्या कवितेच्या मैत्रीविषयी आपल्याशी संवाद साधला आहे. .
गिरीश ओक, गुरू ठाकूर, स्पृश्या जोशी, जितेंद्र जोशी, मृण्मयी देशपांडे, संकर्षण कऱ्हाडे या सिने-मालिका कलावंतांनी त्यांचा काव्यप्रवास त्याचबरोबर वैभव जोशी, संदीप खरे या सिनेगीतकार कविवर्यांचा काव्य प्रवास ही आपल्यासाठी पर्वणीच आहे.
प्रा. मिलिंद जोशी, लक्ष्मीकांत देशमुख, वि.सु. चव्हाण, भारती पांडे यांच्या कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.
डॉ.अश्विनी धोंगडे, संगीता जोशी, रमण रणदिवे, प्रदीप निफाडकर, रामदास फुटाणे, डॉ.नीलिमा गुंडी, स्नेहसुधा कुलकर्णी, अंजली कुलकर्णी, डॉ. संदीप अवचट, प्रभा सोनवणे, ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर, वैशाली मोहिते अशा एकूण 66 नामवंत कवी-कवयित्रींच्या कवितांचा आस्वाद आपण या अंकात घेऊ शकता.
असा साहित्य विषयक रुची आणि अभिरूची जपणार साहित्यादीप दिवाळी अंक आपल्याला नक्कीच वाचन आनंद देणार आहे.
अंकांचे तपशील पुढीलप्रमाणे:-
दिवाळी अंक : साहित्यादीप
प्रकाशक : साहित्यादीप प्रतिष्ठान
मानद संपादक : वि. सु. चव्हाण
संपादक : ज्योत्स्ना चांदगुडे
मूल्य : ₹१००/-