सर्वस्पर्शी
तन्मय प्रकाशनचा “सर्वस्पर्शी” दिवाळी अंक म्हणजे दर्जेदार साहित्याची मेजवानीच असतो. मागील दहा वर्षांपासूनची ही परंपरा अंकात यंदाही जाणीवपूर्वक जपल्याचे प्रकर्षाने जाणवते. आकर्षक मुखपृष्ठ आणि राज्यभरातील मान्यवर लेखकांचे साहित्य अतिशय सुबक पध्दतीने सादर करण्यात आले आहे. त्यामुळे अंक अवश्य वाचलाच पाहिजे, असा दर्जेदार झालेला आहे.
विशेषतः प्रा. मिनल येवले व वर्षा किडे कुलकर्णी (नागपूर), डी. बी. जगत्पुरिया, डॉ. सतीश तराळ, ज्योती कुलकर्णी, सुनीता तांबे, संजय गोराडे, संजय दोबाडे, पुंजाजी मालुंजकर, नवनाथ गायकर आदी मान्यवर लेखकांचे साहित्य वाचकास खिळवून ठेवणारे आहे.
विशेषतः कोरोना संकट काळातही सकारात्मक संदेश घेऊन आलेला यंदाचा सर्वस्पर्शी दिवाळी अंक म्हणजे दशकपूर्तिची परिपक्वता आणि नावाप्रमाणेच सर्वस्पर्शी झालेला आहे. त्यामुळे हा अंक वाचल्याशिवाय दिवाळीच्या सुटीतील वाचनानंद पूर्ण होऊच शकत नाही, अशा शब्दांत चोखंदळ व रसिक मराठी वाचकांनी अंकाचे स्वागत केले आहे.
लेखन – प्रा. गिरिश पाटील