मैफिल
महाराष्ट्राबाहेर अनेक मराठी बांधव आहेत. त्यांच्या परीने ते विविध प्रयोग सातत्याने करीत असतात. नवी दिल्लीतील मराठी बांधवांच्या एका व्हाट्सअॅप ग्रुप ने काढलेल्या दिवाळी अंकाचे हे तिसरे वर्ष आहे. या अंकाचे नाव आहे मैफिल. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर पसरलेल्या मराठी लेखक कवींची एक आगळंवेगळ कार्य त्यानिमित्ताने समोर आले आहे.
ऑनलाईन स्वरुपाचा हा दिवाळी अंक आहे. तुम्ही या अंकाची पीडीएफ डाऊनलोड करू शकता किंवा डाऊनलोड न करता आॅनलाईनही वाचू शकता. यंदाच्या या डिजिटल अंकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवाळी अंकाची अनुक्रमणिका तुम्ही क्लिक करू शकता. म्हणजे अनुक्रमणिकेतल्या एखाद्या लेखाच्या अथवा कवितेच्या शीर्षकावर क्लिक केल्यास तुम्ही थेट त्या पानावर जाऊन ते साहित्य वाचू शकाल; यासाठी तुम्हाला पीडीएफची पानं स्क्रोल करण्याची आवश्यकता नाही. हे फिचर आपल्या आॅनलाईन रिडरमध्येही उपलब्ध आहे.
अतिशय दर्जेदार साहित्याने परिपूर्ण असा हा दिवाळी अंक आपल्या आधीच्या सगळ्या अंकांप्रमाणेच संग्रही ठेवावा असाच आहे. या अंकातील दर्जेदार साहित्याचा आनंद तर घ्यावाच पण त्याचबरोबर आपल्या दिवाळी अंकाच्या लिंक्स आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आणि सर्व साहित्यप्रेमी आप्तजनांना जरूर पाठवा, असे आवाहन मैफिल टीमने केले आहे.
मैफिल हा दिवाळी अंक पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा :
*मैफिल दिवाळी अंक २०२०*
*मैफिल दिवाळी अंक २०२० – ऑनलाईन रिडर*