शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

स्वस्त दरात वीजनिर्मिती करावी,  ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देश

नोव्हेंबर 11, 2020 | 11:22 am
in राज्य
0
em

मुंबई- वीजक्षेत्रातील आपल्या उत्तम गतलौकिकाचे भान ठेवून महानिर्मितीने आता वीजक्षेत्रातील आगामी  संधीचा वेध घेणे आवश्यक आहे.त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान,नवनवीन संकल्पनाचा अवलंब करून कार्यक्षमता वृद्धिंगत करून अधिकाधिक स्वस्त दरात वीजनिर्मिती करावी असे निर्देश  ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले.”व्हिजन-२०३० साठीचा नियोजन आराखडा” या विषयावरील खास व अभिनव संकल्पने अंतर्गत मंगळवारी  मुंबई मुख्यालय येथे संपन्न झालेल्या  महानिर्मितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
 
आगामी १० वर्षांचा नियोजनबद्ध आराखडा बनवून व त्याची यशस्वी अंमलबजावणी करून महानिर्मिती खुल्या स्पर्धेत उतरून  देशाच्या वीजक्षेत्रात  नक्कीच उज्ज्वल वाटचाल करू शकते असा विश्वास  मा ऊर्जामंत्री  यांनी या प्रसंगी व्यक्त केला.आगामी काळात मेरिट ऑर्डर डिस्पॅच प्रणाली ही केवळ राज्यपातळीवरच नव्हे तर देश पातळीवर राबवली जाईल,याची वेळीच दखल घेऊन अत्यंत कार्यक्षमता राखून वीजनिर्मिती साध्य करावी लागणार आहे,असेही ते म्हणाले.संगणकीय सादरीकरणाद्वारे गेल्या वर्षभरातील महानिर्मितीच्या कामगिरीचा समग्र आढावा  घेत असताना ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी  विविध बाबीमध्ये मौलिक व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले .
 
 सौरऊर्जेसाठी उपकंपनी स्थापणार
सदर बैठकीत महानिर्मितीची शक्तिस्थाने-विविध समस्या-  स्पर्धात्मक वीजक्षेत्रातील भावी संधी यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.सर्वाधिक औष्णिक स्थापित क्षमता हे जरी सध्या महानिर्मितीचे बलस्थान असले तरीही यापुढील काळ हा अपारंपारिक ऊर्जेचा आहे याचे भान ठेवून अंमलबजावणीत रखडलेले काही सौर प्रकल्प वेगाने मार्गी लावणे गरजेचे आहे ,तसेच या क्षेत्रातील अद्ययावत  संकरित तंत्रज्ञान अवगत करून टप्प्याटप्प्याने  भावी काळातील सुमारे २७०० मेगावाट क्षमतेचे सौरप्रकल्प गतिमानतेने साकारावेत असे निर्देश त्यांनी या प्रसंगी दिले.हे नियोजन प्रभावीपणे करण्यासाठी महानिर्मिती कंपनी अंतर्गत सौर ऊर्जेसाठी एक उपकंपनी स्थापन केल्यास उत्तरदायित्व निश्चित करून विहित वेळेत सौरऊर्जा क्षमता वाढ शक्य होईल असेही त्यांनी सूचित केले.महानिर्मितीकडे सध्या उपलब्ध मोकळ्या जमिनींचा  पर्यावरण पूरक छोटे छोटे सौर प्रकल्प  उभारणीसाठी कसा उपयोग होऊ शकेल याचीही व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश त्यांनी दिले. 
अनावश्यक खर्चात शक्य ती बचत करून महानिर्मितीने आपली आर्थिक सक्षमता वाढविण्यासाठी मुख्यत्वे कोळसा इंधन खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.या बाबत मार्गदर्शन करताना कोळसा वहन हानी टाळण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करावा असेही निर्देश त्यांनी दिले.
पारंपारिक चौकटीबाहेरचा विचार करून,प्रसंगी संशोधन विकास(R & D)संदर्भात आय आय टी वा तत्सम तज्ञ संस्थांची मदत घेऊन व कालानुरूप प्रशिक्षण कार्यक्रम राबवून महानिर्मितीला उर्जितावस्था पुन्हा प्राप्त करता येईल. एन टी पी सी सारख्या उपक्रमातील उत्तम कार्यपद्धती अंगिकारून,महानिर्मिती मधील आंतरिक सुसंवाद वाढवून उत्तम कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन व सुमार कामगिरी करणाऱ्यांवर कारवाई असे धोरण आखणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अतिरिक्त कोळसा वहन खर्चामुळे  तुलनेने काहीसे जास्त वीजदर असलेले परळी-नाशिक-भुसावळ येथील वीजसंच कार्यरत ठेवण्यासाठी  व्यावसायिक दृष्टिकोन अंगिकारून खुल्या बाजारातील संधी शोधणे गरजेचे आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले. सदर बैठकीत एनर्जी मिक्स सारखी नवी संकल्पना,एनर्जी ऑडिट,आगामी काळात  जलविद्युत निर्मिती क्षमता-कार्यक्षमता  वाढवण्याची  संभाव्यता लक्षात घेऊन त्यासाठी एका विशेष पथकाची निर्मिती,कोणतेही प्रकल्प विहित वेळेतच पूर्ण करण्याची निकड,उरण वायूविद्युत केंद्राचे अत्याधुनिकीकरण व क्षमतावाढ, महानिर्मितीला स्वतःच्या मालकीच्या गरे पालमा -२ कोळसाक्षेत्राच्या विकसन प्रक्रियेला गतिमान करण्याची निकड,तिथेच खाणीनजिक रिजेक्ट कोळश्यावर आधारित वीज प्रकल्प उभारण्याची संभाव्यता,गोसिखुर्द सारख्या  विशाल जलसाठ्यावर तरंगते सौर प्रकल्प उभारणी,राखेची उपयोगिता वाढविण्यासाठी च्या विविध प्रभावी उपाय योजना,वीज वहनातील गळती कमी करणेसाठी पारेषण या यंत्रणेशी योग्य समन्वय इत्यादी महत्वपूर्ण बाबीवर देखील  मंथन झाले
या विशेष बैठकीत महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे,(भा प्र से), संचालक(माइनिंग), पुरुषोत्तम जाधव,संचालक(प्रकल्प),  थंग पंडियन,प्रभारी संचालक (संचलन) राजू बुरडे,कार्यकारी संचालक(संचलन), अभय हरणे, कार्यकारी संचालक(राख व सौर) कैलास चिरुटकर,कार्यकारी संचालक(प्रकल्प), संजय मारुडकर, उरण,तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर अर्णब गोस्वामी यांना सुप्रिम कोर्टाचा दिलासा

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साजरी करणार अशी दिवाळी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
CM 3005 1 680x375 1

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साजरी करणार अशी दिवाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011