नाशिक – शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वराज्य परिवाराच्या संचालिका वर्षा मोरोणे व व संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब नेहरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून धनादेशाचे वाटप करण्यात आले. चंद्रकांत मोगले ,राहुल खरात, वैष्णवी राजपूत, चेतन चव्हाण अशा अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी नेहरे म्हणाले की, समाजात आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांची संख्या कोरोनामुळे खूपच वाढली आहे. पालकांना नसलेला रोजगार याचा परिणाम कुटुंबांवर झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासाठी शिकण्याची इच्छा असतानाही शिक्षण घेता येत नाही. हीच बाब लक्षात ठेऊन या परिवाराच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटक असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी ही एक छोटीशी मदत करण्यात आली आहे. याचा विद्यार्थ्यांना भविष्यात आपल्या शैक्षणिक वाटचालीसाठी नक्कीच लाभ होईल, असे ते म्हणाले.
याप्रसंगी विनायक सूर्यवंशी, वाल्मिक शिंदे, किरण सूर्यवंशी, अॅड. शिवाजी शेळके, शरद बस्ते, माधवराव पागे, शेखर फरताळे, डॉ. दिलीप गरुड, केशव उगले, विजय पाटोळे, मोहन गरुड, दीपक तायडे, राजेंद्र पारधे, भाऊसाहेब भोंडवे, आनंद पाच्छापूरकर, रवींद्र हाते, नवनाथ हुमन, योगेश रिंझट, आकाश बकुरे, विजय मोराडे, मयुर पाटील, रेखा नेहरे, लतिका गरुड, सुनिता बस्ते, राधिका तोरणे आदी उपस्थित होते.