नाशिक – म्हसरूळ येथे ‘स्वराज्य परिवाराच्या’ वतीने जागतिक आदिवासी म्हणजेच आत्मसन्मान दिन अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महापुरुषांच्या व क्रांतिवीरांच्या प्रतिमांचे पूजन विविध पोलीस कर्मचारी, मनपा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकर राईट पँथर ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास पगारे होते. अध्यक्षपदी स्वराज्य परिवाराचे प्रमुख शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे होते. म्हसरूळ परिसरात कोरोना संकट काळामध्ये कार्यरत असलेल्या मनपा कर्मचारी, अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक असलेले प्रकाश उखाडे, सुनील परदेशी, नितीन पगारे, विशाल मोराडे, राजू थोरात, दत्तात्रय शेखरे आदींचा सन्मान स्वराज्य परिवाराचे खजिनदार वाल्मिक शिंदे, नवनाथ हुमन,आकाश बकुरे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी सोमनाथ गुंबाडे, शांताराम नेहरे, राजेंद्र पारधी, धर्मेंद्र बागुल, आकाश बकुरे, रामनाथ डोंगरे, गणेश गांगुर्डे, प्रवीण थुल, राजू बनसोडे, मनोज गायकवाड, दत्तात्रेय शेखरे, संजय थोरात, बंडू खाडे आदी उपस्थित होते.