मुंबई/नाशिक – नाशिक स्मार्ट सिटी कंपनीला आणि महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मखमलाबाद आणि हनुमानवाडीतील प्रस्तावित नगररचना परियोजनेला (टीपी स्कीम) उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. महासभेने शेतकऱ्यांचा विरोध डावलून या परियोजनेला मंजुरी दिली होती. त्यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी या स्कीमच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
७५४ एकरावर ही परियोजना करण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेबाबतचे आक्षेप मागविण्यात आले होते. त्यावर सुनावणी न घेताच योजनेला मंजुरी कशी देण्यात आली, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.