नाशिक – स्मार्ट सिटी अंतर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये हवेचे शुद्धीकरण तपासण्यासाठी विशिष्ट प्रकारचे सेन्सर तयार करण्यात आले. शहरात त्याची अंमलबजावणी करण्यात आली. दरम्यान, परिसर एनजीओतर्फे नुकताच यासंबंधी अहवाल सादर केला आहे. शहरातील हवा शुद्ध नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. समाधानकारक अहवाल प्राप्त न झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शुद्ध हेवेची चाचणी करणारे सेन्सर नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर तसेच ठाणे या शहरांमध्ये सुरु करण्यात आले होते. मात्र वाहनांचे तसेच औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदूषण पाहता समाधानकारक अहवाल प्राप्त न झाल्याचे एनजीओने म्हटले आहे. तसेच शुद्ध हवेची चाचणी करण्यासाठी कार्यान्वित असलेली यंत्रणेने दिलेली माहिती समाधानकारक नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत वायु गुणवत्तेसाठी हे सेन्सर लावण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीत कोणतीही स्पष्टता आढळली नाही असे अहवालात नमूद आहे. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (एनसीएपी) आणि स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत हवेच्या गुणवत्तेची चाचणी करण्यासाठी सेन्सर बसवण्यात आले. मात्र, उद्योगनिहाय वर्गीकरण करतेवेळी माहिती संकलित करणे अवघड जात असल्याचे यंत्रणेने सांगितले आहे.