नाशिक – केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशन सुरू केले आहे. या प्रकल्पामध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. याद्वारे त्या त्या महापालिका क्षेत्रात भरीव काम करण्याची संधीही चालून आली आहे. महापालिका किंवा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम (TULIP) राबविण्यात येत आहे. त्यात अनेकांना संधी आहे. एमबीबीएसचे शिक्षण झालेल्यांना प्रति महिना ६० हजार, बीएएमएस झालेल्यांना प्रति महिना ४० हजार, बीएचएमएस झालेल्यांना ३५ हजार तर नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्यांना प्रति महिना सात हजार रुपये वेतन मिळणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज https://t.co/TIIGhRdHjs या लिंकवर भरायचे आहेत.