नवी दिल्ली – अनेक चिनी ऍप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. त्यानंतर ट्विटर आणि फेसबुकवरही चीनवर बहिष्कार घालण्यासंबंधी मोहिम उघडण्यात आली आहे. चीनच्या मोबाइल फोनवर बहिष्कार घालण्याची देखील चर्चा सुरु आहे. तुम्हालाही नवीन स्मार्ट फोन घ्यायचा असेल आणि चीनचा फोन नको असेल, तर आम्ही तुम्हाला देतो हे भारतीय फोनचे पर्याय. या स्मार्ट फोनची किंमत १० हजारांपेक्षा कमी आहे.
मायक्रोमॅक्स इव्हॉक ड्युअल नोट
हा खूप मस्त लुक्स असलेला फोन आहे. याचा स्क्रीन ५.५ इंचाचा आहे. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबीचे स्टोअरेज आहे. याची किंमत जवळपास ४८०० एवढी आहे.
लावा z ६१ pro
या फोनमध्ये ड्युअल सिम आणि ५.४५ इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी हा खूप चांगला फोन आहे. फोटोग्राफीचे विविध पर्याय यात उपलब्ध आहेत. याची किंमत ५७७७ एवढी आहे.
मायक्रोमॅक्स भारत ५ इन्फिनिटी एडिशन
या फोनमध्येही ड्युअल सिमची सोय आहे. १ जीबी रॅम आहे. ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा तर क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. १६ जीबी इंटर्नल मेमरी आहे आणि मेमरी कार्डद्वारे ती ६४ जीबी पर्यंत जाऊ शकते. याची किंमत ७००० आहे.