मुंबई – इंटरनेट व सोशल मिडीयावर आपल्या प्रायव्हसीच्या बाबतीत स्मार्टफोनधारक हल्ली सजग झाले आहेत. आपल्या प्रायव्हेट चॅट कुणालाही बघता येऊ नयेत किंवा त्याचा एक्सेस कुणालाही मिळू नये, असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. आपणही याबाबतीत सजग असाल तर काही मार्ग अवलंबवावे लागतील.
व्हॉट्सएपवर सिक्युअर चॅट – व्हॉट्सएप चॅटसाठी बाय डिफॉल्ट एंड-टू-एंड एनक्रिप्शनचा वापर होतो. २०१६ मध्ये ते अस्तित्वात आले होते. या प्लॅटफॉर्मवर ऑडियो-व्हिडीयो, टेक्स्ट मेसेज आदी एनक्रिप्टेड आहेत. गृप चॅटदेखील यात समाविष्ट आहे. त्यामुळे ज्यांच्यासोबत आपण चॅट करतोय तेच मेसेज वाचू शकतात. अगदी व्हॉट्सएपसुद्धा यात हस्तक्षेप करू शकत नाही. हे सगळे आपोआप होत असते. त्यासाठी कुठलेही सेटींग करण्याची गरज नाही.
कसे जाणून घ्यावे – त्यासाठी सर्वांत पहिले व्हॉट्सअॅप चॅट ओपन करा. त्यानंतर वर कॉन्टॅक्टवर जाऊन इन्फो पेजवर पोहोचा. इथे खाली एनक्रिप्शनचे ऑप्शन असेल. त्यावर टॅप केल्यानंतर आपल्याला क्यू आर कोड आणि ६० अंकी संख्या दिसेल. त्यातही संबंधित व्यक्ती आसपास असेल तर स्कॅन कोडचा पर्याय वापरू शकता.
टेलीग्रामवर सिक्युअर चॅट – आपण जर टेलिग्रामवर शिफ्ट झालेले असाल तर हे जाणून घ्यावे लागेल की त्यावर सिक्युरिटी फिचर जरा वेगळ्यापद्धतीने कार्य करते. हे मुळातच सर्व चॅटसाठी सर्व्हर-क्लायंट एनक्रिप्शनचा वापर करतात.
टेलिग्रामवर सिक्रेट चॅट – ज्यांच्यासोबत चॅट करायचे आहे त्या युझरचे चॅट प्रोफाईल उघडा. त्यानंतर वर उजव्या बाजूला देण्यात आलेल्या तीन डॉट्सच्या ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर स्टार्ट सिक्रेट चॅटच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर एक नवे चॅट विंडो उघडेल. त्यावर आपण गोपनियरित्या लोकांसोबत चॅट करू शकता.