नाशिक – दीपक व मेघा दीपक तायडे या आदर्श दाम्पंत्याने त्यांचे वडिल चंदू गोदू तायडे यांच्या आठवणींना उजाळा देऊन, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे स्पर्धा परीक्षा वाचनालयास १०० स्पर्धा परीक्षेचे पुस्तके व धनादेशाची भेट दिली. म्हसरूळ परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला त्यामुळे बळ मिळणार आहे. या भेटीनंतर दीपक तायडे व मेघा तायडे यांचे स्वराज्य परिवाराचे सदस्य विजय मोराडे यांनी सत्कार केला.
या कार्यक्रमाप्रसंगी स्वराज्य परिवाराचे प्रमुख शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे, विनायक सूर्यवंशी, वाल्मीक शिंदे, विजय मोराडे, शिवाजी शेळके, शेखर फरताळे, शरद बस्ते, केशव उगले, विजय पाटोळे माधवराव पागे, नवनाथ हुमन, योगेश रिंझट, मयुर पाटील,आकाश बकुरे, प्रकाश उखाडे, मोहिनी भगरे ,रेखा नेहरे, लतिका गरुड, सुनिता बस्ते, मंगला शिंगाडे, प्रिया पाटील, सुप्रिया गावित, राजेंद्र पारधी, भाऊसाहेब भोंडवे हे उपस्थित होते. आभार स्वराज्य परिवाराच्या महिला प्रमुख रेखा नेहरे यांनी मानले. स्वराज्य परिवाराचे अध्यक्ष शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे यांच्यावतीने नाशिक जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्य केले जाते.