नाशिक – ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत आहेत. त्यानिमित्त निमंत्रक संस्था असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या पदाधिका-यांचे कौतुक करण्यासाठी नाशिकमधील प्रमुख साहित्य संस्था व सार्वजनिक वाचनालय यांनी शुक्रवारी २२ जानेवारी ६.०० वाजता.हनुमानवाडी येथील भावबंधन मंगल कार्यालय येथए कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
त्यासाठी या सर्व संस्थेच्या वतीने सोशल मीडियावर मेसेजही टाकण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, हे संमेलन नाशिकमध्ये व्हावे यासाठी गेल्या वर्षी सार्वजनिक वाचनालयाने प्रयत्न केले. पण, तांत्रिक अडचणींमुळे सावानाच्या ऐवजी लोकहितवादी मंडळाच्या माध्यमातून हे संमेलन होत आहे. हे संमेलन नाशिकमध्ये व्हावे यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून यश मिळविले याबद्दल लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी निश्चितच कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या धडपडीला मिळालेल्या यशानिमित्त नाशिक मधील सर्व साहित्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि या सर्व साहित्य संस्थांच्यावतीने या धडपड्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर नाशिककर साहित्य संस्थांच्यावतीने कौतुकाची थाप मारण्यासाठी त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी खास कौतुक सोहळा आयोजित केलेला आहे.
या संस्थेतीची नावे या मेसेज खाली दिलेली आहे. सार्वजनिक वाचनालय (सावाना), कुसुमाग्रज प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिकरोड, नाशिक कवी, मराठी कथा लेखक संघ, संवाद, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ-नाशिक शाखा, कुसुमाग्रज साहित्यिक मंच, साहित्य कणा, काव्यमंच,नारायण सुर्वे कवी कट्टा, गिरणा गौरव परिवार, साहित्य,कला व व्यक्ती विकास मंच, विश्व मराठी परिषद, कुसुमाग्रज मराठी विचार मंच,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, नाशिक साहित्य मंच,परिवर्त परिवार, व्यासपीठ परिवार, साहित्य रसिक मंडळ, सुर्योदय सर्वसमावेशक मंडळ, कादवा शिवार, इगतपुरी तालुका साहित्य मंडळ,सुभाष वाचनालय, पंचवटी वाचनालय, ज्ञानेश्वर वाचनालय, सुधीर फडके वाचनालय, सर्वात्मक वाचनालय अशी आहे.