मुंबई – स्टेट बँकेतील २३ कोटी ८६ रुपयांची बँक फसवणूक प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणी सीबीआयने स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहा अधिकारी आणि नाशिकच्या या रिअल इस्टेट फर्मवर गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपींकडे झडती घेत असताना ५० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सक्षम अधिका-यांनी खटला काढून घेतल्यानंतर सीबीआयने बँकेच्या सहा अधिका-या विरोधात खटला दाखल केला आहे. सोमवारी हा गुन्हा दाखल करून मुंबई, नाशिक,नागपूर, बंगरुळू अशा चार शहरांमध्ये ११ ठिकाणी तपास करण्यात आला. हे प्रकरण नाशिकमध्ये निवासी प्रकल्प तयार करण्यासाठी मंजूर झालेल्या कर्जाच्या कथित अनियमिततेशी संबंधित आहे. याबाबतची सविस्तर माहिती अद्याप आलेली नाही. बँकेचे स्थानिक अधिकारी सुध्दा याबाबत अनभिज्ञ आहे. बँकेच्या अधिका-यांमध्ये एक अधिकारी नाशिकचा आहे. तर इतर अधिकारी मुंबईचे असल्याचे बोलले जात आहे.