कोलकाता – भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांना छातीत दुखत असल्याने पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करुन अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना ७ जानेवारी रोजी डिस्चार्जही देण्यात आला होता. आता त्यांनी पुन्हा त्रास झाल्याने अॅडमिट करण्यात आले आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना बरे वाटत होते. तसेच त्यांनी प्रसिद्धी माध्यमांनाही सांगितले होते.