कोलकाता – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सकाळच्या सुमारास त्यांच्या छातीत आणि पाठीत दुखत होते. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार असल्याचे हॉस्पिटलच्यावतीने सांगण्यात येत आहे. डॉक्टर त्यांच्या तब्ब्येतीवर लक्ष ठेवून आहेत.
https://twitter.com/ANI/status/1345285351980470273